खरीपाची गुडन्यूज; शेतकऱ्यांना दिवसाच्या वीजेसह वेळेवर खते-बियाणे मिळणार…

fertilizers and seeds : खरीप हंगाम जवळ आला असताना शेतकऱ्यांची सर्वात मोठी गरज म्हणजे वेळेवर बियाणे, खते आणि दिवसा वीजपुरवठा. ही गरज ओळखून राज्य सरकारने नियोजन सुरू केले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात दिलासा देणारी माहिती दिली आहे. खरीपासाठी आवश्यक असलेले बियाणे, खते, कीटकनाशके शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी कृषी विभागासोबत […]
मॉन्सूनचे आगमन; भात रोपवाटिकेचे असे करा व्यवस्थापन…

Arrival of monsoon : भात शेतीतील पहिल्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे रोपवाटिका. भाताच्या पट्ट्यात अनेक भागांमध्ये आता भात रोपवाटिकेच्या व्यवस्थापनाकडे अधिक वैज्ञानिक पद्धतीने पाहिले जात आहे. भात शेतीतील कार्यक्षम व दर्जेदार उत्पादनासाठी रोपवाटिकेचे व्यवस्थापन काटेकोरपणे केले तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. रोपवाटिका व्यवस्थापनात सर्वप्रथम, नर्सरी प्लॉटची निवड व त्याची माती पूर्वतयारी खूप महत्त्वाची मानली […]
पावसाळी वातावरणात द्राक्ष , डाळिंबाची कशी काळजी घ्याल?

rainy weather : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील कृषी हवामान विभागाने १० ते १४ मे २०२५ या कालावधीत संभाव्य पावसाचा आणि हवामान बदलाचा अंदाज दिला असून, त्यानुसार द्राक्ष, डाळिंब व आंबा पिकांसाठी महत्त्वाचे कृषी सल्ले दिले आहेत. द्राक्ष पिकासाठी सल्लाद्राक्ष बागांमध्ये सध्या खरड छाटणीस सुरुवात करण्याचा काळ आहे. ओलांड्यावर असलेली जुनी काडी एक जोडा ठेवून छाटावी. […]
अवकाळीच्या पार्श्वभूमीवर ऊस, हळद आणि फळपिकांची अशी घ्या काळजी..

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून मिळालेल्या अंदाजानुसार मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत तूरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञ समितीने शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला जारी केला आहे. हळद आणि ऊसाची अशी घ्या काळजी:सध्या ऊस पिकात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव […]
कमी पाण्यात उत्पादन देणाऱ्या या नव्या भाताच्या वाणाबद्दल माहीत आहे का?

Rice varieties : देशात अलिकडेच भाताचे नवे वाण शोधले गेले असून, ते कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारे आणि हवामान बदलाला तोंड देणारे आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि विविध संशोधन संस्थांनी मिळून “कमला-DRR धान-100” आणि “पूसा DST राइस-1” ही दोन नवी वाण तयार केली आहेत. ही वाण विशेषतः महाराष्ट्रासारख्या पावसावर अवलंबून असलेल्या भागात उपयुक्त ठरणार […]
‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीसाठी घेतला पुढाकार; पहा सविस्तर…

Natural farming : राज्यभरात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यातील सुमारे २ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती (Natural farming) केली जाणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्माच्या वतीने कृषी विभागाने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अशी माहिती देण्यात आली. जालना जिल्ह्यातील २७०० हेक्टर […]
या डेअरीने केली दूध दरात वाढ; दूध उत्पादकांना मिळणार का लाभ?

Increase in milk prices : मदर डेअरीने आपल्या दूधाच्या किमतीत प्रत्येकी दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून हे नवीन दर ३० एप्रिल २०२५ पासून लागू होतील. ही वाढ मोठ्या प्रमाणात लागू होणाऱ्या दिल्ली–एनसीआर, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये लगेचच लागू होईल; इतर भागात हळूहळू लागू होतील. मदर डेअरीने सांगितले आहे की, गेल्या काही महिन्यांमध्ये […]
शेतातील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सोपे उपाय, जाणून घ्या…

organic carbon : शेतातील मातीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे अतिशय गरजेचे आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ‘क्रॉपसॅप’ प्रकल्पांतर्गत झालेल्या शेतकरी–शास्त्रज्ञ संवादात मृदा तज्ज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर यांनी खालील सोपे उपाय सांगितले आहेत. मातीतील पोत संतुलित ठेवण्यासाठी ती ४५ % खनिज पदार्थ, २५ % हवा आणि २५ % पाण्याने समृद्ध असावी. उरलेले ५ […]
आता मोबाईलद्वारे करा ‘स्मार्ट पद्धतीने’ तणांचा बंदोबस्त…

Weed control : शेतकरी पिकांच्या उत्पादनासाठी मेहनत घेत असताना तण नियंत्रण एक महत्त्वाचे आणि आव्हानात्मक काम असते. तणामुळे पिकांना आवश्यक असलेली सूर्यमाले, पाणी आणि पोषण मिळत नाही, ज्यामुळे पिकांचे उत्पादन कमी होऊ शकते. याशिवाय तणाच्या वाढीमुळे कीटक, रोग आणि पाणी वाया जाणे यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी योग्य उपाय […]
शेतकऱ्यांसाठी ठिबक आणि शेततळ्याच्या अनुदानासाठी इतक्या कोटींची तरतूद; तुम्ही लाभ घेतला का?

Drip anudan : शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा मिळावी, त्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतीवरचा अनिश्चिततेचा भार कमी व्हावा यासाठी राज्य सरकारने सन २०२५-२६ या वर्षासाठी ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना’ राबवण्यास प्रशासकीय मान्यता दिली असून, यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निर्णय २४ एप्रिल रोजीच्या शासन आदेशाने (शासन निर्णय क्रमांक: मुशाशे ०४२५/प्र.क्र.८८/१४-अे) अधिकृत करण्यात आला […]