समजावून घ्या कांदा बीजोत्पादनासाठी एकात्मिक परागीभवनाचे महत्त्व…

Onion seed production : कांदा पिकात परागीभवन होऊन बीजधारणा होते. बीजोत्पादनात पराग वाहक म्हणून मधमाश्यांची भूमिका महत्वाची असते. परागीकरण चांगले होण्याकरिता व्यवस्थापनामध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. फुलकिडींच्या व्यवस्थापनासाठी शिफारशीत कीटकनाशकांचा वापर पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वीच करावा. फवारणी शक्यतो सायंकाळी करावी. मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी मोहरी, बडीशेप, कोथिंबीर यांसारखी पिके बीजोत्पादन क्षेत्राच्या सभोवती लावावीत. कांदा पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी […]
सध्याच्या वातावरणात कोंबड्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे असे करा नियोजन…

poultry farming:हिवाळ्यात बऱ्याच वेळेस पिण्याच्या पाण्याचे तापमान कमी असल्यामुळे कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण घटते. कोंबड्यांच्या खाद्य सेवनाच्या प्रमाणात पाणी पिण्याचे प्रमाण असणे आवश्यक आहे. साधारणतः योग्य तापमानात कोंबड्या खाद्याच्या दुप्पट पाणी पितात. परंतु हे पाणी पिण्याचे प्रमाण घटल्यास मूत्रपिंडात युरिक अॅसिडचे घनीकरण होते आणि असे युरिक अॅसिड मूत्रपिंड आणि मूत्रवाहिनीमध्ये साठून राहते. कोंबड्यांना गाऊट होतो, […]
टोमॅटोची देशात किती लागवड झालीय? यंदा कसे असतील भाव..

tomato lagvad : गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे बाजारातील दर घसरताना दिसून येत आहेत. पुणे बाजारात रविवारी टोमॅटोला सरासरी एक हजार तर कमीत कमी ६००रुपयांचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. खरीपातील लागवड वाढल्याने तसेच हिवाळ्यातील घटलेल्या मागणीमुळे टोमॅटोचे दर घसरले असल्याचे व्यापारी सांगतात. मात्र अनेकांना उत्सुकता आहे की रब्बीची लागवड केलेल्या टोमॅटोला किती दर मिळतील? टोमॅटोची लागवड आणि […]
मराठवाड्यातले वसंतराव लाड पिकवतात ४० एकरवर करडई…

farmer success story:शाश्वत तेलबियांसाठी देशात तेलबियांचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. काही शेतकरी तेलबिया पिके घेऊन तेलबिया वाढीच्या मिशनला हातभार लावत आहेत. त्यापैकीच एक आहेत मराठवाड्यातले शेतकरी. मानवत (जिल्हा परभणी) येथील प्रगतशील शेतकरी वसंतराव लाड यांनी यंदा ४० एकर करडईचे पीक घेतले आहे. श्री. लाड हे प्रतिवर्षी अंदाजे ४० ते ५० एकर करडई पिकाची पेरणी करतात. […]
हळदीचे जोरदार उत्पादन पाहिजे? मग काढणीच्या वेळी या गोष्टी कराच

halad salla: जमिनीच्या पोताप्रमाणे माळरानाच्या हलक्या जमिनीमध्ये हळद पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ८० ते ९० टक्के पाने वाळलेली असतात. तर मध्यम व भारी जमिनीमध्ये ६० ते ७० टक्के पाने वाळलेली असतात. हे हळद पीक परिपक्वतेचे मुख्य लक्षण मानले जाते. हळदीच्या काढणीअगोदर १५ ते ३० दिवस पिकास पाणी देणे बंद करावे. एकदम पाणी देणे बंद करू […]
तुती बागेवर दुर्मिळ किटक आढळला; असा करा बंदोबस्त..

mulberry garden:भारत देशात 6 ते 7 प्रकारचे कोळी किटकांचा तुती बागेवर प्रादूर्भाव होतो, त्यात टेट्रानायचस इक्विटो रोस व टेट्रानायचस लूडिनी हृया होत. कुन्नूर तमिळनाडू येथे प्रथम इयूटेट्रानायचस अरीयंटलीस या कोळी किटकाचा तुती बागेवर प्रादुर्भाव दिसून आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत […]
उन्हाळी केळीवरील रोग टाळायचा? तर आंतरपीक म्हणून तीळ लावा…

Keli lagwad: उन्हाळ्यात केळी लागवड करताना आंतरपीक म्हणून तीळ पिकाची निवड करा तापमानातील बदल केळी पिकावर होणार नाही. बरेच शेतकरी फेब्रुवारी महिन्यात केळी लागवडीकडे वळतात किंवा केळी करीत असल्याचं निर्देशनस येत आहे. त्याला कारण असे की गेल्या पाच, सात वर्षांपासून फेब्रुवारीत लागवड केलेल्या केळीला बाजारपेठेत चांगला भाव मिळत असून शेतकऱ्याला त्याचा खूप मोठा फायदा होत […]
वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठी बातमी? जाणून घ्या शेत जमिनीबाबत काय परिणाम?

Waqf bill: वक्फ सुधारणा विधेयक सुधारणेसाठी पाठविण्यात आले होते. आज त्या संदर्भात एक मोठी बातमी येत आहे. ती म्हणजे संसदीय समितीने या संदर्भातील विरोधकांनी मांडलेल्या सर्व ४४ सुधारणा फेटाळल्या आहेत. मात्र सत्ताधारी पक्षाशी संबंधित १४ सुधारणा मंजूर करण्यात आल्या आहेत. संयुक्त संसदिय समितीचे अध्यक्ष जगदम्बिका पाल यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. […]
मोह फुलापासून तयार होत आहेत पौष्टिक लाडू..

Flower production : मोहाच्या फुलांचा हंगाम सुरू झाला असून हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता या फुलांपासून पौष्टिक लाडू तयार करण्याकडे वळले आहे. त्यासंदर्भात नुकतेच येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षणही घेण्यात आले. मोहाच्या फुलापासून आयुर्वेदिक औषधीयुक्त लाडू बनवण्याची प्रक्रिया आणि त्याचे प्रशिक्षण काल उमरदरा वाडी तालुका, कळमनुरी येथे घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी श्री महादजी शिरोडकर , […]
गावाकडून मुंबईत आल्या आणि एका दिवसात करोडपती झाल्या; महिला एफपीओंची कामगीरी

Performance of Women FPOs : ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू असलेल्या अनेक प्रयत्नांना यश येत आहे, उमेद अभियानांतर्गत स्थापित शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांच्या उत्पादकांना किंवा मालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी महालक्ष्मी ट्रेड सरस म्हणजेच खरेदीदार आणि विक्री करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्याचे संमेलन सिडको कन्व्हेन्शन सेंटर, वाशी येथे झाले. महाराष्ट्रात सध्या ४५० पेक्षा जास्त शेतकरी […]