Give a missed call to order – 9096633907

यंदाच्या खरीपात ऊस वाढला, सोयाबीन घटले; जाणून घ्या पीक पेऱ्याची माहिती…

यंदाच्या खरीपात ऊस वाढला, सोयाबीन घटले; जाणून घ्या पीक पेऱ्याची माहिती…

Kharif crop

Kharif crop : खरीप हंगाम २०२५ मध्ये १८ जुलैपर्यंत देशात एकूण ७०८.३१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ६८०.३८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. म्हणजे यंदा एकूण पेरणी क्षेत्रात २७.९३ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. मात्र ही वाढ सर्व पिकांमध्ये समान नसून काही पिकांचे क्षेत्र वाढले आहे तर काही पिकांमध्ये […]

सोयाबीन, बाजरी, उस आणि हळद व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या टिप्स…

mportant tips

Important tips : विस्तारीत हवामान अंदाजानुसार मराठवाड्यात १८ ते २४ जुलै २०२५ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार असून कमाल तापमान सरासरीइतके ते थोडेसे अधिक राहण्याची शक्यता आहे. २५ ते ३१ जुलै दरम्यान मात्र पावसाचा अंदाज सरासरीइतकाच असून तापमानात फारसा बदल होणार नाही. सॅक-इसरो, अहमदाबादच्या उपग्रह चित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित घटलेला आहे. याचा परिणाम पिकांवरील […]

एकच यंत्र करेल अनेक पिकांची पेरणी; न्यूमॅटिक प्लांटर बद्दल जाणून घ्या…

Sowing of crops

Sowing of crops : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक अत्याधुनिक पेरणी यंत्र उपलब्ध करून दिले आहे. या यंत्राचे नाव न्यूमॅटिक प्लांटर असून याचा वापर विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात प्रात्यक्षिकातून सुरू करण्यात आला आहे. हे यंत्र मल्टीक्रॉप म्हणजेच अनेक पिकांची पेरणी एकाच यंत्रातून करू शकते. यात विशेष प्रकारच्या प्लेट्स लावून कापूस, सोयाबीन, मका, हरभरा, मूग, उडीद, […]

यंदा मका पेरलाय? जाणून घ्या ऑक्टोबर ते डिसेंबरचे संभाव्य दर…

Maize sowing

Maize sowing : सध्या खरीप हंगामात अनेक शेतकरी मका पिकाकडे वळताना दिसत आहेत. यामागे बाजारातील स्थिर मागणी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादनातील घट व देशांतर्गत पातळीवरील कमी साठा हे प्रमुख घटक आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी मका या पिकाच्या किंमती २२५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांतील तुलना करता, […]

मराठवाड्यात पेरण्या लांबल्या; सोयाबीन, कापसाच्या पेरणीसाठी सल्ला…

Advice for sowing

Advice for sowing : मराठवाडा विभागात यंदाच्या खरीप हंगामात अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर खरीप पेरणी लांबली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतून 11 ते 24 जुलै 2025 या कालावधीसाठी हवामानाचा आणि पेरणीयोग्य परिस्थितीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा सल्ला जारी करण्यात आला आहे.  […]

कोरडवाहूसाठी बीटी कपाशीचे नवे वाण; बियाणेही मिळते आणि उत्पादनही वाढते…

cotton varieties

cotton varieties : नांदेड येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या दोन नवीन बीटी कापूस वाणांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय वाण निवड समितीने औपचारिक मान्यता दिली आहे. एनएच २२०३७ बीटी बीजी २ आणि एनएच २२०३८ बीटी बीजी २ या वाणांची दिनांक १९ जून २०२५ रोजी पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र, मध्यप्रदेश […]

जास्त पावसामुळे कापसाच्या शेतात मुळे कुजण्याचा धोका…

Cotton fields

 Cotton fields : राज्यातील अनेक भागात जास्त पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने कपाशी पिकावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी आकस्मिक मर आणि मूळकूज रोगाची लक्षणे दिसून येत असून पिकांच्या उत्पादनक्षमतेवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी वेळीच पीक व्यवस्थापन उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ. भगवान आसेवर, […]

समाधानकारक पावसात मका, सोयाबीन, बाजरी आणि भुईमूग पेरणीसाठी अशी घ्या काळजी…

Crop care

Crop care : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या लागवडीसाठी योग्य स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्र, इगतपुरी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, मका, सोयाबीन, बाजरी आणि भुईमूग या पिकांसाठी पेरणीचे नियोजन करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात. मका पेरणीसाठी सपाट वाफ्यावर पेरणी करावी. पेरणीचे अंतर लवकर पिकणाऱ्या जातींसाठी ६०x२० सेमी, […]

दिलासादायक, फळपीक विमा योजनेच्या नोंदणीला मुदतवाढ…

दिलासादायक, फळपीक विमा

Insurance plan : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ देऊन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्याचे कृषिमंत्री अँड माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य शासनाच्या योग्य समन्वयामुळे पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता ६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत मृग बहार २०२५ मध्ये द्राक्ष, […]

खरीपासाठी शासन सज्ज; खते-बियाणांसाठी स्वतंत्र यंत्रणा, नुकसानभरपाईही देणार…

Kharif season

Kharif season : यंदा जून महिन्यात समाधानकारक पावसामुळे राज्यभरात खरीप हंगामाच्या पेरण्या वेळेत पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले असून, पेरणीपूर्व तयारीपासून संभाव्य नुकसानीपर्यंत सर्वच पातळीवर यंत्रणा सक्रिय ठेवण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व  खते उपलब्ध करून देण्यासाठी यंदा वेगळी यंत्रणा उभारली आहे. बियाणे दुकानदारांवर थेट […]