या खरीप हंगामात भात लागवडीचा उच्चांक; देशातही विक्रमी तांदूळ साठा…

Rice cultivation : चालू २०२५-२६ खरीप हंगामात देशात भात लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २५ जुलै २०२५ रोजीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशभरात २४५.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली असून, गेल्यावर्षी याच कालावधीत हे क्षेत्र २१६.१६ लाख हेक्टर होते. यामध्ये तब्बल १३.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला […]
शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीला राष्ट्रीय बाजारपेठेचा मार्ग खुला; ई-नाम योजनेसाठी कायद्यात बदल…

E-NAM Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी व्यापक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना त्यांच्या मालाला रास्त दर मिळावा आणि बाजार व्यवस्थेत पारदर्शकता यावी, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘ई-नाम’ (इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. […]
ऊसावरील पांढरी माशी आणि हळदीवरील करपा, या उपायाने घालवा…

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि हवामान सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने दिलेल्या अलीकडील शिफारशीनुसार, मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा साच आणि जमिनीत चिखल निर्माण झालेला आहे. त्यामुळे ऊस आणि हळद या प्रमुख नगदी पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. हळद पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर अति पाऊस झाल्यास मुळांना […]
पशुपालकांनो सावधान! कासदाहापासून गाई-म्हशींचे असे करा संरक्षण…

Cattle breeder : सध्या पावसाचे प्रमाण वाढले असून, काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या हवामानाचा जनावरांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असून, विशेषतः गाई आणि म्हशींमध्ये कासदाह या आजाराचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोठ्यांतील स्वच्छता व दैनंदिन काळजी याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे. कासदाह हा रोग बहुधा पावसाळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. […]
धाराशिव जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने सोयाबीन उत्पादन वाढवण्याचा पहिला पायलट प्रकल्प – शेतकऱ्यांसाठी नवी दिशा !

AI experiment : धाराशिव जिल्ह्यातील उपळा गावात भारतातील पहिलाच AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, ज्याचा उद्देश सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढवणे आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून त्यांच्या शेती व्यवस्थापनात मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. हवामान, रोगराई, जमिनीची माहिती, आणि शेतीची नियोजन यासाठी प्रगत डिजिटल प्रणाली वापरण्यात येत […]
यंदाच्या खरीपात ऊस वाढला, सोयाबीन घटले; जाणून घ्या पीक पेऱ्याची माहिती…

Kharif crop : खरीप हंगाम २०२५ मध्ये १८ जुलैपर्यंत देशात एकूण ७०८.३१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ६८०.३८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. म्हणजे यंदा एकूण पेरणी क्षेत्रात २७.९३ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. मात्र ही वाढ सर्व पिकांमध्ये समान नसून काही पिकांचे क्षेत्र वाढले आहे तर काही पिकांमध्ये […]
सोयाबीन, बाजरी, उस आणि हळद व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या टिप्स…

Important tips : विस्तारीत हवामान अंदाजानुसार मराठवाड्यात १८ ते २४ जुलै २०२५ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार असून कमाल तापमान सरासरीइतके ते थोडेसे अधिक राहण्याची शक्यता आहे. २५ ते ३१ जुलै दरम्यान मात्र पावसाचा अंदाज सरासरीइतकाच असून तापमानात फारसा बदल होणार नाही. सॅक-इसरो, अहमदाबादच्या उपग्रह चित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित घटलेला आहे. याचा परिणाम पिकांवरील […]
एकच यंत्र करेल अनेक पिकांची पेरणी; न्यूमॅटिक प्लांटर बद्दल जाणून घ्या…

Sowing of crops : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक अत्याधुनिक पेरणी यंत्र उपलब्ध करून दिले आहे. या यंत्राचे नाव न्यूमॅटिक प्लांटर असून याचा वापर विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात प्रात्यक्षिकातून सुरू करण्यात आला आहे. हे यंत्र मल्टीक्रॉप म्हणजेच अनेक पिकांची पेरणी एकाच यंत्रातून करू शकते. यात विशेष प्रकारच्या प्लेट्स लावून कापूस, सोयाबीन, मका, हरभरा, मूग, उडीद, […]
यंदा मका पेरलाय? जाणून घ्या ऑक्टोबर ते डिसेंबरचे संभाव्य दर…

Maize sowing : सध्या खरीप हंगामात अनेक शेतकरी मका पिकाकडे वळताना दिसत आहेत. यामागे बाजारातील स्थिर मागणी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादनातील घट व देशांतर्गत पातळीवरील कमी साठा हे प्रमुख घटक आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी मका या पिकाच्या किंमती २२५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांतील तुलना करता, […]
मराठवाड्यात पेरण्या लांबल्या; सोयाबीन, कापसाच्या पेरणीसाठी सल्ला…

Advice for sowing : मराठवाडा विभागात यंदाच्या खरीप हंगामात अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर खरीप पेरणी लांबली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतून 11 ते 24 जुलै 2025 या कालावधीसाठी हवामानाचा आणि पेरणीयोग्य परिस्थितीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा सल्ला जारी करण्यात आला आहे. […]