Give a missed call to order – 9096633907

सध्याच्या वातावरणात तूरी आणि ज्वारीसाठी इतकं कराच

सध्याच्या वातावरणात तूरी आणि ज्वारीसाठी इतकं कराच

Tur farming : सध्याच्या परिस्थितीत तूर, ज्वारी, गहू, कापूस पिकांचे कसे व्यवस्थापन करायचे, किडींचा बंदोबस्त कसा करायचा? हे जाणून घेऊ कापूस पीकाचे व्यवस्थापन : १. वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही.२. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा […]

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी;‘किसान कवच सूट’ मुळे औषध फवारणीचा धोका टळणार

Kisan Kavach Body Suit : शेतात औषधे, किटकनाशके यांची फवारणी करताना शेतकऱ्यांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आता त्या परिणामांपासून वाचण्यासाठी किसान कवच नावाने कीटकनाशक विरोधी संपूर्ण स्वदेशी सूटची निर्मिती करण्यात आली आहे. त्याला नाव दिलेय किसान कवच. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); डॉ जितेंद्र सिंह यांनीनवी दिल्ली येथे किसान कवच या भारताच्या पहिल्या […]

शेतीच्या योजनांचा लाभ चालू ठेवायचाय? मग आजच करा आधार अपडेट

Aadhaar update : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, म्हणजेच त्यात नवीन माहिती टाकण्यासाठीची मुदत १४ डिसेंबरला संपली होती. मात्र तरीही अनेकांनी अजूनही आधारकार्ड अपडेट केलेले नाही. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी ही मुदत आता सहा महिन्यांनी वाढविली आहे. म्हणजेच आता आधार कार्ड १४ जूनपर्यंत अपडेट करता येईल. आधार कार्ड अपडेट गरजेचे १. आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा […]

थंडी वाढतेय, शेळ्या मेंढ्यांसह जनावरांची अशी घ्या काळजी..

Dairy farming: महाराष्ट्रात बहुतेक सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका कायम असून या काळात शेळ्या, मेंढ्या यांच्यासह गाई, म्हशी व पशुधनाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. हिवाळ्यात गोठा व्यवस्थापन असे करा* १. वारा, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी योग्य निवारा, गाभण गाई-म्हशींची योग्य व्यवस्था, आरामदायी व उबदार बसण्याची सुविधा तसेच शक्य तेवढे कोरडे वातावरण ठेवावे.२. गोठा हवेशीर असावा. पुरेसा […]

शेतकऱ्यांना विनातारण मिळणाऱ्या २ लाख कर्जचा लाभ कसा घ्यायचा?

kcc agriculture loan: शेतकऱ्यांना किसान कार्डच्या (kcc) च्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा रिझर्व्ह बँकेने वाढविली आहे. कृषी क्षेत्राला आर्थिक आधार देण्यासाठी आणि लागवडीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त तारण मुक्त कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. तसेच शेतीशी संलग्न अन्य कामांसाठीही कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याचे आरबीआयने जाहीर केले. […]

काय सांगता? कापसामुळे पडले सोयाबीनचे बाजारभाव? कसे ते वाचा

भारतीय कापूस महामंडळा अर्थात सीसीआयच्या कारभारामुळे तेलाच्या बाजारात ताण निर्माण होऊन सोयाबीन आणि मोहरीचे भाव पडल्याची घटना या आठवड्यात घडली आहे. दुसरीकडे परदेशातील भाववाढीमुळे सोयाबीन तेल, पामतेल, शेंगदाणा तेल यांच्या किंमती वधारले. कापसामुळे सोयाबीन तेल बियांच्या किंवा मोहरीच्या तेलबियांच्या किंमती कशा घसरल्या असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण झालेय तसेच. यंदा सीसीआय म्हणजेच कापूस खरेदी […]

हवामान बदलले, ऊस-हळदीचे कसे करायचे पीक व्यवस्थापन?

Sugarcane farming : पुढील पाच दिवस हवामन कोरडे राहण्याची शक्यता असल्यामूळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे. ऊसाचे व्यवस्थापन: ऊस पिकात आवश्यकतेनूसार […]

ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका, तूर, ज्वारी, गव्हाची अशी घ्या काळजी

Rabi crop: सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे पिकावर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशकाची फवारणी करावी तसेच पिकात, फळबागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. कापूस पिकाचे व्यवस्थापन: वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून […]

गहू तीन आठवड्याचा झालाय, पीकात तणही आलेय, असा करा बंदोबस्त….

Gahu sheti : अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेले गहू पिक सध्या 21 दिवसाचे झाले आहे. मात्र त्यामध्ये रुंद व गवत वर्गीय तण आढळून येत आहेत. त्यावर शेतकरी उपाय शोधत आहेत. ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. अरुण कांबळे यांनी त्यावर पुढील उपाय सुचवला आहे. गहू पिकामध्ये रूंद व गवतवर्गीय तणांचे नियंत्रणासाठी खालील कोणत्याही एका तणनाशकांचा वापर करावा १. […]

राज्यात विकसित झाले टोमॅटो आणि मिरचीचे आले नवे वाण, मिळाली जाणून घ्या वैशिष्ट्ये…

Tomato and Chilly variety: उद्यानविद्या पिकांची गुणवत्ता, अधिसूचना आणि वाण प्रसाराणासाठीच्या दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या ३१व्या केंद्रीय उपसमितीच्या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या उद्यानविद्या संशोधन (भाजीपाला) केंद्राने विकसित केलेले टोमॅटो वाण पीबीएनटी-२०, मिरची वाण पीबीएनसी-१७ आणि विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेला चिंच वाण ‘शिवाई’ यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस […]