आचारसंहिता संपताच कृषी योजनांना येणार गती; नवी नोंदणी करणे होणार शक्य..

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच संपुष्टात येत असून त्यामुळे शेतीसह विविध योजनांच्या कामाला पुन्हा गती येणार आहे. राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महाडिबीटीसह अनेक संकेतस्थळावर नव्याने नोंदणी बंद होती. ती आता पुन्हा सुरू होणार असल्याने अनुदानासाठी तसेच नव्याने नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहेत. आयुष्यमान भारतसह आयुष्यमान भारत वय वंदना योजनेसाठी […]
माळरानावरच्या फळबागेतून सुमनबाईं लखपती झाल्यात, त्याची प्रेरणादायी कहाणी..

नांदेडच्या सीमा ओलांडून भोकर तालुका लागला की लहान डोंगरांची माळ सुरू होते. भोकरच्या पायथ्याला मुदखेड-अर्धापूर तालुक्यातील जमिनीचा पोत हा केळी, ऊस, हळद व इतर फळबागांसाठी पोषक आहे. त्या तुलनेत भोकरच्या माळरानावर शेतीला फुलवणे हे तसे आव्हानात्मक आहे. भोसी येथील सौ. सुमनबाई दिगंबर गायकवाड या महिलेने आपल्या माळरानावर असलेल्या शेतीसाठी स्वप्न पाहिले. ते सुद्धा फळबाग शेतीची. […]
तुमच्या मोबाईलवरूनही रब्बी पीक विमा काढा, तोही एक रुपयांत, जाणून घ्या कसे ते…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीपानंतर आता रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा मिळणार असून त्यासाठी नोंदणी करण्याची शेवटची मुदत १५ डिसेंबर रोजी आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा काढलेला नाही. जवळच्या संगणक सेवा केंद्राच्या मदतीने पीक विमा भरता येईल किंवा आपल्या मोबाईलवरही अवघ्या काही मिनिटांत पीक विमा भरता येईल. मोबाईलवर पीक विमा भरण्यासाठी […]
निवडणुकीनंतर पुण्याच्या बाजारात आज भाजीपाल्याला काय दर मिळाला…

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काल २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान असल्याने बहुतेक बाजारसमित्यांमधील व्यवहारांना सुटी होती. आज सकाळी भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे बाजारसमितीसह लासलगाव-पिंपळगाव या बाजारसमित्यांचे कामकाज नियमित सुरू झाले. आज पुणे जिल्ह्यातील पिंपरी बाजारसमितीत सकाळी लोकल कांद्याला सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. कमीत कमी बाजारभाव १ हजार, तर जास्तीत जास्त ६ हजार […]
मतदानानंतर आज पेट्रोल डिझेलचे नवीन भाव प्रसिद्ध; शेतकऱ्यांना डिझेलसाठी किती मोजावे लागणार पैसे?

दिनांक २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान सुरूळीत पार पडले. आता २३ नोव्हेंबरच्या निकालाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले असतानाच शेतकरी आणि सामान्य जनतेचे लक्ष मात्र इंधनाच्या दराकडे लागलेले आहे. मध्यंतरी माध्यमांतील बातम्यांनुसार निवडणुकांनंतर इंधनाचे दर वाढतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठाच फटका बसणार होता. कारण आधीच खतांसह कृषी […]
विधानसभा मतदानासाठी शेतकरी सज्ज, उद्या होणार मतदान…

राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या मतदानासाठी शहरी मतदारांसमवेत ग्रामीण मतदार व शेतकऱ्यांमध्ये उत्साह असून विविध समस्यांनी ग्रस्त झालेला शेतकरी मतदानाच्या माध्यमातून प्रतिनिधी निवडण्यासाठी सज्ज झाला आहे. राज्यातील 9 कोटी 70 […]
सोयाबीनचे बाजारभाव वाढतील का? डिसेंबरमध्ये सोयाबीन खाऊ शकतो भाव…

यंदा सोयाबीनचे बाजारभाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असून शेतकºयांना सोयाबीनच्या बाजारभाव वाढीची अपेक्षा आहे. सध्या राज्यातील प्रमुख बाजारांत सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहेत. या आठवड्यात सोयाबीनला सरासरी 3800 रुपये ते 4100 रुपये प्रति क्विंटल असा दर प्रतवारीनुसार मिळाला आहे. आगामी काळात सोयाबीनचे बाजार वधारतील का याचा अंदाज कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या तज्ज्ञांनी बाजार […]
कापूस विकायचा की साठवायचा?

आज सकाळी कोपरना बाजारात कापसाला (Kapus bajarbhav) सरासरी 7 हजार रुपयांचा प्रती क्विंटल बाजार भाव मिळाला. या ठिकाणी सुमारे साडेतीन हजार क्विंटल आवक झाली आहे. सध्या बाजारात लांब आणि मध्यम स्टेपलच्या कापसाला (cotton Market price) सरासरी 7 हजार दोनशे ते 7 हजार 300 रुपयांचा भाव मिळत आहे, तर लोकल कापसाला सरासरी 7 हजार रुपयांच्या आसपास […]
लासलगावला लाल कांद्याला आज काय बाजारभाव मिळाला उन्हाळी कांद्याचे काय आहेत दर

मागील दोन दिवसांपासून राज्यातील बाजारसमित्यांमध्ये लाल आणि उन्हाळ कांदा मिळून सरासरी पावणेदोन लाख क्विंटल आवक होत आहे. आज सकाळच्या (Today’s onion market rate) सत्रात मात्र कांदा आवक (Kanda Bajarbhav) सुमारे 25 हजार क्विंटल इतकी झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा बाजारभावात काहीशी घसरण दिसली, तरी बाजारभाव बºयापैकी टिकून असल्याचे दिसून येत आहे. आज दिनांक 15 नोव्हेंबर […]
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना: वार्षिक ३ गॅस सिलेंडर मोफत सह शासनाने दिले हे निर्देश, वाचा सविस्तर.

सध्याच्या स्थितीत काही प्रकरर्णी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचणी येत आहेत . या स्थितीत घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलानांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, ज्यामुळे अन्नपूर्णा योजनेंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांच्या खात्यात जमा कारणात येईल.