Give a missed call to order – 9096633907

यंदा पीक विम्यासाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या…
Crop insurance

Crop  insurance : महाराष्ट्र शासनाने खरीप 2025 व रब्बी 2025-26 हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुधारित स्वरूपात लागू केली आहे. यामध्ये उत्पादनावर आधारित कप आणि कॅप मॉडेल 80:110 पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ही योजना फक्त अर्धसुरक्षित क्षेत्रातील अर्धसुरक्षित पिकांसाठीच लागू असून, क्षेत्र आधारित पद्धतीने नुकसान भरपाई निश्चित होईल.

विमा भरपाई कोणत्या पिकासाठी मिळेल?
खरीप हंगामासाठी खालील अन्नधान्य, कडधान्य व नगदी पिके विम्याच्या संरक्षणाखाली आहेत
* अन्नधान्य व कडधान्ये: भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका
* तेलबियां: भुईमूग, तीळ, सोयाबीन, काळे वाटाणे
* नगदी पिके: कापूस, खरीप कांदा

किती विमा हप्ता भरावा लागेल?:
* अन्नधान्य व गळीत धान्य पिके: विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के
* नगदी पिके (कापूस व कांदा): विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के

शेतकऱ्याने भरावयाचा हप्ता हा विमा संरक्षित रकमेच्या वाजवी टक्केवारीनुसार किंवा प्रत्यक्ष हप्ता रक्कम यापैकी जो कमी असेल तोच भरावा लागेल. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात भरण्यात येईल.

कंपन्यांची नेमणूक कोणत्या जिल्ह्यासाठी झाली आहे?
महाराष्ट्रातील 12 जिल्हा समूहांसाठी खालील कंपन्यांची निवड झाली आहे. उदाहरणार्थ
* नाशिक, औरंगाबाद (छ. संभाजीनगर), चंद्रपूर, पालघर या जिल्ह्यांसाठी – भारतीय कृषी विमा कंपनी
* धुळे, अकोला, परभणी, गोंदिया, जालना, सोलापूर, कोल्हापूर इ. जिल्हे – भारतीय कृषी विमा कंपनी किंवा आयसीआयसीआय लोम्बार्ड अशा वेगवेगळ्या विमा कंपन्या नेमण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल?
पिकाचे उत्पादन निश्चित मर्यादेपेक्षा कमी झाल्यास संपूर्ण महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. यासाठी पिकाची पाहणी व कापणी प्रयोग होणार आहेत. भात, सोयाबीन, गहू व कापूस यासाठी 50 टक्के प्रत्यक्ष कापणी व 50 टक्के तांत्रिक पाहणी आधारित पद्धत लागू होईल.

उदाहरणार्थ, ज्या मंडळात भाताचे सरासरी उत्पादन 1800 किलो प्रति हेक्टर असून, या हंगामात केवळ 1200 किलो प्रति हेक्टर उत्पादन झाले, तर 70 टक्के जोखमीच्या मर्यादेनुसार भरपाई दिली जाईल. भरपाईचं गणित हे सरासरी उत्पादनात झालेल्या घटीच्या प्रमाणात व विमा संरक्षित रकमेच्या आधारावर ठरवले जाईल.

शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात?
* ई-पीक पाहणीसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे
* ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे पण 7/12 उताऱ्यावर नाव नसेल, बोगस शेतकरी आढळल्यास विमा रद्द केला जाईल
* पीक बदल असल्यास योग्य वेळेत विमा कंपनीस कळवणे बंधनकारक आहे
* विमा हप्ता कापल्यानंतर योजनेतून बाहेर पडायचं असल्यास मुदतीत बँकेला लेखी कळवणे आवश्यक आहे

Source :- krishi24.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *