
Harbhara bajarbhav : काल ७ एप्रिल रोजी राज्यात हरभऱ्याची एकूण आवक ७२ हजार ४१० क्विंटल इतकी झाली. यावेळी हरभऱ्याला मिळालेला सरासरी बाजारभाव सुमारे ५७०० रुपये प्रती क्विंटल होता. केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी यंदा जाहीर केलेला हमीभाव ६,३५२ रुपये प्रति क्विंटल आहे. त्यामुळे सध्याचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा सुमारे ६५० रुपये इतका कमी आहे.
काल सोमवारी कारंजा बाजार समितीत सर्वाधिक म्हणजे २ हजार २० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. तिथे सरासरी बाजारभाव ५६२० रुपये इतका होता. तर सर्वात कमी म्हणजे केवळ १ क्विंटल आवक उमरगा बाजारात झाली, तिथे हरभऱ्याला ५७६० रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
दरम्यान लाल हरभऱ्याची सर्वाधिक आवक लातूर बाजारात झाली असून ती १३ हजार १४० क्विंटल इतकी होती. या बाजारात सरासरी बाजारभाव ५९५० रुपये होता. चाफा हरभऱ्याची सर्वाधिक आवक मलकापूर बाजारात १ हजार ७६० क्विंटल झाली होती आणि तिथे सरासरी दर ५६७५ रुपये मिळाला. काट्या हरभऱ्याची सर्वाधिक आवक तळुजापूरमध्ये १२४ क्विंटल झाली असून तिथे सरासरी दर ५६५० रुपये होता.
काबुली हरभऱ्यासाठी सर्वाधिक आवक जालना बाजारात ८० क्विंटल झाली, सरासरी दर ७६०० रुपये होता. गरडा प्रकाराची आवक सोलापूरमध्ये सर्वाधिक ८६ क्विंटल होती आणि बाजारभाव ५६५० रुपये होता. जंबो हरभऱ्याची सर्वाधिक आवक चोपडा बाजारात ७०० क्विंटल इतकी होती व सरासरी बाजारभाव १० हजार रुपये नोंदवला गेला. पिंपळगाव बसवंत – पालखेड येथे हायब्रीड हरभऱ्याची सर्वाधिक ७ क्विंटल आवक होती व सरासरी दर ६३६० रुपये होता.
दरम्यान काल लातूरमध्ये हरभऱ्याला ५९५० रुपये, धुळ्यात ५७०० रुपये, जालन्यात ५७५० रुपये, अमरावतीत ५८२५ रुपये, नागपुरात ५९०२ रुपये, हिंगणघाटमध्ये ५७२० रुपये, दोंडाईचाला ४९०० रुपये तर चोपड्यात ६५०० रुपयांचा सरासरी बाजारभाव मिळाला.
Source :- krishi24.com