Give a missed call to order – 9096633907

द्राक्षाला अवकाळीचा फटका? काळजी करू नका या टिप्समुळे वाचतील द्राक्षबागा…
Unseasonal for grapes
Unseasonal for grapes : अवकाळी पावसापूर्वी शेतातील माती वापसा स्थितीत असावी, जेणेकरून मुळे पाणी शोषून घेत नाहीत आणि छत आणि गुच्छांमध्ये स्थलांतरित होऊ शकत नाहीत ज्यामुळे बेरी कॅकिंगची समस्या उद्भवते. द्राक्षबागेत योग्य उतार असल्यास पावसाचे पाणी वाहून जाईल, अन्यथा द्राक्षबागेत आर्द्रता वाढली असती. दरम्यान सध्याच्या स्थितीत द्राक्ष उत्पादनकांनी काय काळजी घ्यायची याबद्दल महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले आहे.

घडकूज व डाऊनी मिल्ड्यची समस्या:

सततच्या पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे घडकुज व डाऊनी मिल्ड्यूची समस्या येण्याची दाट शक्यता असल्याकारणाने यावर पुढील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील, घड स्पष्टपणे दिसताच फेलफुटी त्वरित काढून घ्याव्यात.

वेलीवर झिंक आणि बोरॉन प्रत्येकी ०.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी.

पालाश (०-०-५०) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी. यामुळे वेल सशक्त होण्यास मदत होईल. एखादे सायटोकायनीनयुक्त संजीवक कमी प्रमाणात फवारून घ्यावे.

पाऊस जास्त झालेल्या परिस्थितीत ओलांडा किंवा खोडावर चाकूने जखम करावी. त्यामुळे सायटोकायनीनची पातळी वाढण्यास मदत होते. भुरी रोगाचे नियंत्रणासाठी डायफेनकोनॅझोल २५ ईसी @ ०.५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढणे आवश्यक आहे व बोद वाफसा स्थितीत राहतील अशी काळजी घ्यावी.

द्राक्ष बागेतील पाने व घडांमधील साचलेले पाणी काढण्यासाठी रिकामा ब्लोअर उलटसुलट बागेत फिरवणे आवश्यक आहे. त्यामुळे आद्रता कमी होण्यास मदत होईल. भुरी रोगाचे नियंत्रणासाठी सल्फर ८० डब्लूडीजी २.० ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा ही फवारणी करताना घडावर डाग येवू नये म्हणून चांगल्या दर्जाचे स्प्रेडर्स वापरावेत किंवा मेट्रोफेनॉन ५०% एससी २५० मिली प्रती हेक्टर किंवा मायक्लोब्युटॅनिल १० डब्ल्यूपी@ ०.४ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकांची फवारणी करावी.

ज्या द्राक्ष बागांमध्ये सध्या द्राक्षे पिकत आहेत, तेथे मणी तडे जाण्याची शक्यता आहे, म्हणून प्रथम तडे गेलेले खराब मणी काढून टाकावे आणि नंतर क्लोरीन डायऑक्साइड 50 पीपीएमची फवारणी करावी

Source :- krishi24.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *