
Tomato rate : टोमॅटोचे रब्बी हंगामातील उत्पादन क्षेत्र यंदा वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बाजारभावात घट होण्याचा अंदाज आहे. मात्र त्यातील घट मागच्या सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असल्याचे दिसत आहे. मागच्या आठवड्यात ५०० रुपये सरासरी दरापर्यंत घसरलेला टोमॅटो या आठवड्यात मात्र काहीसा वधारलेला दिसला.
आज सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी पुणे बाजारात टोमॅटोची १६५१ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ६०० रुपये, जास्तीत जास्त १२०० रुपये अ्राणि सरासरी ९०० रुपये प्रति क्विंटल असे या ठिकाणी मिळाले. पिंपरी बाजारात सरासरी ११०० रुपये बाजारभाव मिळाले, मोशी बाजारात सरासरी ९०० रुपये बाजारभाव मिळाले.
दरम्यान जळगाव बाजारात वैशाली टोमॅटोला सरासरी ५०० रुपये बाजारभाव मिळाले. तर कराड बाजारात वैशाली टोमॅटोला आज सोमवारी कमीत कमी ५०० रुपये जास्तीत जास्त १५०० रुपये आणि सरासरी १५०० रुपये बाजारभाव मिळाला. पाटण बाजारात सरासरी १३५० बाजारभाव मिळाला. या दोन्ही बाजारात टोमॅटोला सर्वाधिक बाजारभाव होते.
अकलूज, जि. सोलापूर बाजारात टोमॅटोला सरासरी १ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला, तर संभाजीनगर बाजारात सरासरी ६०० रुपये बाजारभाव मिळाला.
Source :- krishi24