
Gram prices : फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात अनेक शेतकऱ्यांचा हरभरा काढणीवर येणार आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात हरभरा किती भाव खाणार? याची प्रत्येकाला उत्सुकता आहे.
हरभरा हे भारतातील मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि उपभोग असणारे डाळवर्गीय पिक आहे. जागतिक पातळीवर एकूण डाळ उत्पादनापैकी २० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, तुर्की, म्यानमार, पाकिस्तान आणि इथिओपियासह सहा देश जागतिक हरभरा उत्पादनात सुमारे ९० टक्के योगदान देतात. भारत हा हरभऱ्याचा प्रमुख उत्पादक देश असून जगातील एकूण उत्पादनात भारताचा वाटा सुमारे ७०-७५ टक्के आहे. भारतातील एकूण डाळ उत्पादनापैकी ४०-५० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. देशभरात हरभऱ्याचा वापर डाळ व बेसन या दोन्ही स्वरूपात केला जातो.
मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष जानेवारी २०२४-२५ (२२ जानेवारी २०२५ पर्यंत) मधील हरभऱ्याची आवक मागील वर्षाच्या तुलनेत थोडी कमी झालेली दिसून येत आहे. जानेवारी २०२५ मध्ये ती ०.४ लाख टन इतकि आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ०.५ लाख टन इतकी होती.
हरभरा हे रब्बी पिक असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२३-२४ मध्ये हरभऱ्याचे उत्पादन सुमारे ११०.४ लाख टन होण्याची शक्यता आहे जे मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील २०२२-२३ मधील उत्पादन २९.७ लाख टनांवरून सन २०२३-२४ मध्ये २८.४ लाख टनांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर २०२२ पासून हरभऱ्याच्या किंमती वाढत आहेत. ऑगस्ट २०२३ नंतर, त्या भारत सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहेत.
यंदा फेब्रुवारीत काय मिळणार बाजारभाव
मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील हरभऱ्याच्या फेब्रुवारी मधील सरासरी किंमती खालीलप्रमाणेः
फेब्रुवारी २०२२ः रु. ४,६६१/क्विंटल
फेब्रुवारी २०२३ः रु. ४,७२६/क्विंटल
फेब्रुवारी २०२४: रु. ६,०३२/क्विंटल
रब्बी हंगाम २०२५-२६ साठी हरभऱ्याची सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत रु. ५,६५०/क्विंटल इतकी आहे. मागील वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आयात वाढलेली आहे तर निर्यात कमी झालेली आहे. लातूर बाजारातील संभाव्य किंमती फेब्रुवारी २०२५ मध्ये रु. ५,६०० ते ६,१००/क्विंटल, अशा असू शकतील, सदर संभाव्य अंदाज हा FAQ ग्रेड च्या हरभऱ्यासाठी आहे. असा अंदाज कृषी विभागाच्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षाने दिला आहे.
Source :- krishi24.com