
Onion seed production : कांदा पिकात परागीभवन होऊन बीजधारणा होते. बीजोत्पादनात पराग वाहक म्हणून मधमाश्यांची भूमिका महत्वाची असते. परागीकरण चांगले होण्याकरिता व्यवस्थापनामध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे.
फुलकिडींच्या व्यवस्थापनासाठी शिफारशीत कीटकनाशकांचा वापर पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वीच करावा. फवारणी शक्यतो सायंकाळी करावी. मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी मोहरी, बडीशेप, कोथिंबीर यांसारखी पिके बीजोत्पादन क्षेत्राच्या सभोवती लावावीत. कांदा पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी त्यांची कापणी करावी.
जमिनीत अतिरिक्त ओलावा किंवा अधिक कोरडेपणा असल्यास मधमाश्या येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, यासाठी जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने पुरेसे पाणी द्यावे.
शेतामध्ये फुलोऱ्यात असणारी सर्व तणे काढून टाकावीत.
चांगल्या परागीभवनासाठी १० टक्के फुले उमलल्यानंतर, शेतात मधमाश्यांच्या पेट्या (एपिस मेलीफेरा/ एपिस सेराना जातीच्या ४ ते ६ पेट्या किंवा टेट्रागोनुला स्पे. ८ ते १२ पेट्या प्रति एकर) ठेवाव्यात. शेतात आणि सभोवतालच्या क्षेत्रात मधमाशी पेटीचे तोंड शेताच्या आतील दिशेने ठेवावे.03:25 PM
source :- krishi24.com