Give a missed call to order – 9096633907

तुमच्याही कोबीची पाने चिकट तेलकट होत आहेत का? हा उपाय करा

Kobi farming krishi salla : कोबी आणि कोबीवर्गीय पिकांना सध्याचे थंड आणि मधूनच ढगाळ होणारे वातावरण मावा प्रादुर्भावास अनुकूल आहे. हिरव्या किवा काळ्या रंगाचे मावा कोवळ्या पानातील अन्नरसाचे शोषण करतात. त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होऊन पिवळी पडतात आणि वाळून जातात. त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिलेला प्रभावी उपाय करता येईल.

मावा शरीरातून चिकट पदार्थ बाहेर टाकतात. हा पदार्थ पानावर साठून राहिल्याने पाने चिकट व तेलकट दिसतात. त्यानंतर या पदार्थावर काळी बुरशी वाढते. परिणामी, प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते, झाडांची वाढ खुंटून उत्पादनात घट येते.

व्यवस्थापन
मावा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीला पोहचल्यास, निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडूनिंबावर आधारित कीडनाशक अझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी, या फवारणीमुळे मावा किडीचे प्रमाण कमी होते व मित्र किटकांचे संवर्धन होते.

जैविक कीटकनाशकांमध्ये व्हर्टिसिलीअम लेकेंनी किवा मेटेंन्हायझीयम अॅनिसोप्लीची २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

गरज पडल्यास व जैविक नियंत्रण केले नसल्यास आणि प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेल्यास, रासायनिक कीटकनाशक मॅलॅथिऑन (५० ईसी) २ मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.४ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Source :- krishi24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *