Give a missed call to order – 9096633907

डिसेंबर सुरू झाला, कापसाला सध्या काय बाजारभाव मिळतोय? जाणून घ्या…

Kapus bajarbhav : दिनांक २ डिसेंबर रोजी राज्यात हिंगणघाट बाजारसमिततीत मध्यम स्टेपल कापसाची ८ हजार क्विंटल आवक झाली. याठिकाणी किमान दर ६ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी बाजारभाव ७१०० रुपये प्रति क्विंटल असा होता.

बार्शी टाकळी बाजारात मध्यम स्टेपलच्या कापसाची साडेसात हजार क्विंटल आवक झाली या ठिकाणी कापसाला सरासरी बाजारभाव ७ हजार ४७१ रुपये मिळाला.

वर्धा जिल्ह्यातील आष्टी बाजारसमितीत लांब स्टेपल कापसाची सुमारे ५०० क्विंटल आवक झाली. या ठिकाणी किमान ७१५० रुपये तर सरासरी ७२०० रुपये बाजारभाव मिळाला.

यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२४-२५ साली केंद्र सरकारने कापसाच्या मध्यम स्टेपलसाठी ७ हजार १२१ रुपये, तर लांब-लाँग स्टेपलसाठी ७ हजार ५२१ रुपये प्रति क्विंटलसाठी हमीभाव जाहीर केले आहेत.

सध्या राज्यातील अनेक बाजारसमित्यांमध्ये हमीभावापेक्षाही कमी बाजारभाव मिळत आहेत. नंदुरबार बाजारसमितीत हमीभावापेक्षा सुमारे सव्वाशे रुपये कमी म्हणजेच सरासरी ७ हजार रुपये दर कापसाला मिळत आहेत.

अपवाद वगळता राज्यात सध्या कापसाला हमीभावाच्या जवळपास किंवा हमीभावापेक्षा कमी बाजारभाव मिळताना दिसत आहे.

Source :- Krishi24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *