
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच संपुष्टात येत असून त्यामुळे शेतीसह विविध योजनांच्या कामाला पुन्हा गती येणार आहे.
राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महाडिबीटीसह अनेक संकेतस्थळावर नव्याने नोंदणी बंद होती. ती आता पुन्हा सुरू होणार असल्याने अनुदानासाठी तसेच नव्याने नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहेत.
आयुष्यमान भारतसह आयुष्यमान भारत वय वंदना योजनेसाठी नोंदणी करणे आचारसंहितेमुळे बंद होते. मात्र आता नव्याने योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे सर्व पोर्टल खुले होणार असून त्यांना योजनांसाठी वेगाने नावनोंदणी करणे शक्य होणार आहे.
दरम्यान आज निवडणुकांचे निकाल लागताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या विविध संवर्गांच्या पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर कार्यालयात या मुलाखती घेण्यात येतील.
त्याच धर्तीवर रब्बी हंगामासाठी नव्याने योजनांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून त्यांच्यासह प्रत्येकालाच योजनांसाठी नोंदणी करणे, नवीन प्रकरणे दाखल करणे शक्य होणार आहे.
Source :- krishi24