
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काल २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान असल्याने बहुतेक बाजारसमित्यांमधील व्यवहारांना सुटी होती. आज सकाळी भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे बाजारसमितीसह लासलगाव-पिंपळगाव या बाजारसमित्यांचे कामकाज नियमित सुरू झाले.
आज पुणे जिल्ह्यातील पिंपरी बाजारसमितीत सकाळी लोकल कांद्याला सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. कमीत कमी बाजारभाव १ हजार, तर जास्तीत जास्त ६ हजार असा होता. आज सकाळी केवळ ७ क्विंटल कांदा आवक झाली.
दरम्यान पुणे बाजारसमितीत आज सकाळ टोमॅटोला कमीत कमी हजार रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी १७५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. सुरण २ हजार रुपये, मटार ८ हजार रुपये, वाल पापडी २ हजार ७ पन्नास रु., ब्रोकोली साडेपाच हजार रुपये, बेबी कॉर्न साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करण्यात आले.
पुणे बाजारसमितीत सकाळच्या सत्रात झालेल्या व्यवहारांनुसार निवडक भाजीपाल्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत. (भाजीपाला- कमीत कमी- जास्तीत जास्त- सरासरी दर)
भेडी: 2000–6000–4000, दुधी भोपळा: 1000–2000– 1500, फ्लॉवर:1000– 2000–1500; काकडी:1000–1800–1400, कोबी: 1000–2800–1900,ढोवळी मिरची:2500–5000–3750, टोमॅटो:1000–2500–1750, वांगी: 2000–4000–3000, मिरची (हिरवी): 1500–3000–2250
Source :- Krishi24