
दिनांक २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान सुरूळीत पार पडले. आता २३ नोव्हेंबरच्या निकालाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले असतानाच शेतकरी आणि सामान्य जनतेचे लक्ष मात्र इंधनाच्या दराकडे लागलेले आहे.
आज सकाळी सहा वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जाहीर केले आहेत. आयओसीने हे दर प्रसिद्ध केले असून दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे नवे दर जाहीर केले जातात. त्यानुसार सध्या तरी इंधनाच्या दरात काहीही बदल झालेले नसून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर १०३.४४ रुपये, तर डिझेलचे दर प्रति लिटर ८९.९७ रु. असे आहेत.
सध्या जगातील कच्च्या तेलाच्या किंमती घटताना दिसत आहेत. आजही त्यात किरकोळ स्वरूपात घट झाल्याचे ब्लूमबर्ग एनर्जीने म्हटले आहे. दरम्यान देशात सध्या सर्वात स्वस्त पेट्रोल अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर इथे आहे. याठिकाणी पेट्रोल ८२.६४ रुपये तर डिझेल ७८.०५ रुपये प्रति लिटर इतके आहे. जगात इराणमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल असून येथे केवळ २ रुपये ४१ पैसे इतका प्रति लिटरचा दर आहे.
Source :- krishi24