
यंदा सोयाबीनचे बाजारभाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असून शेतकºयांना सोयाबीनच्या बाजारभाव वाढीची अपेक्षा आहे. सध्या राज्यातील प्रमुख बाजारांत सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहेत. या आठवड्यात सोयाबीनला सरासरी 3800 रुपये ते 4100 रुपये प्रति क्विंटल असा दर प्रतवारीनुसार मिळाला आहे.
आगामी काळात सोयाबीनचे बाजार वधारतील का याचा अंदाज कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या तज्ज्ञांनी बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून वर्तविला आहे. त्यानुसार सोयाबीनच्या उत्पादन आणि सध्याच्या स्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. मात्र हे त्या बदल होऊ शकतो, तसेच त्यांनी वर्तवलेले बाजारभाव हे चांगल्या म्हणजेच एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनसाठी असतील.
सोयाबीन हे जागतिक स्तरावरील महत्वाचे तेलबिया पीक आहे. अमेरिका, बाग्रील, आर्जेन्टिना, चीन, भारत या देशांत सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या देशांत जगातील 90% सोयाबीन उत्पादन होते.
सन २०२१-२२ च्या तुलनेत सन २०२२-२३ मध्ये सोयाबीन तेलाची आयात कमी झाली आहे. चालू वर्षीं नोव्हेंबर २०२३ ते आॅगस्ट २०२४ या कालावधीतीत २७.१४ लाख टन सोयातेलाची आयात झाली आह. भारतात २०२४-२५ मध्ये सोयाबीनचे १०८ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेत ८ टक्केनी अधिक आहे.
अमेरिकन कृषी विभागाच्या अहवालानुसार सन २०२४-२५ मध्ये जगात ५२९२ लाख टन सोयाबीन उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ८.५ टक्केनी (३९४८ लाख टन)अधिक आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत. मागील तीन वषार्तील आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील महिन्यातील सरासरी किंमती खालील प्रमाणे होत्या:
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१: रु.५९८० प्रती क्विटल.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२: रु. ५४२५ प्रती क्रिवटल.
ऑक्टोबर ते डिसेंवर २०२३: रु. ४८५४ प्रती क्विटल.
यंदा कसे असतील बाजारभाव:
सन २०२४-२५ हंगामासाठी किमान आधारभूत किमत रु. ४८९२ प्रती क्विटल आहे. सन २०२३-२४ मध्ये सोयामीलच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. चालू वर्षी एप्रिल ते जून २०२४ मध्ये ४.९७ लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल ते आॅगस्ट २०२४) भारतातून ८.४९ लाख टन निर्यात झाली आहे, ही मागील वर्षीच्या याच कालावधीतील निर्यातीपेक्षा अधिक आहे. हे सर्व लक्षात घेता यंदा लातूर वाजारात डिसेंबरपर्यंत सोयाबीनचे संभाव्य दर रु. ४७०० ते ५२०० प्रती क्विटल (चांगल्या प्रतीसाठी) असतील असा अंदाज बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाने वर्तविला होता.
Source :- Krishi24