Give a missed call to order – 9096633907

ऑनलाइन जमीन नोंदी: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!…
Online land records

Online land records: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि नवीन डिजिटल सुविधा १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांना सातबारा, ८अ उतारे आणि इतर जमीन कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅपवर फक्त १५ रुपये शुल्कात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाकरार: डिजिटल सुविधा
शेतकऱ्यांना आता महाभूमी पोर्टलवर मोबाईल नोंदणी करून ही डिजिटल सेवा मिळवता येईल. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल तसेच फसवणुकीला आळा बसेल.

प्रायोगिक तत्त्वावर सेवा
१५ जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणारी ही योजना संपूर्ण राज्यात पारदर्शक आणि सुरक्षित कागदपत्र सेवा प्रदान करेल. शेतकरी आणि नागरिकांना आता महा ई-सेवा केंद्रांवर रांगा लावण्याची गरज नाही. एक नवीन डिजिटल सुविधा भूमी अभिलेख विभागाने सुरू केली आहे, ज्याद्वारे ई-रेकॉर्ड , फेरफार नोंदी ,८अ उतारे आणि सातबारा थेट व्हॉट्सअ‍ॅपवर मिळतील.

नोंदणी प्रक्रिया
नागरिकांना महाभूमी पोर्टलवर जाऊन आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल. नोंदणीसाठी एकदाच जमिनीच्या मालकीचा पुरावा आणि ५० रुपये शुल्क द्यावा लागेल. मोबाईल क्रमांक OTP द्वारे पडताळला जाईल. नोंदणी पूर्ण झाल्यावर ई-रेकॉर्ड ,८अ उतारे, फेरफार नोंदी आणि सातबारा डिजिटल स्वरूपात व्हॉट्सअ‍ॅपवर डाउनलोड करता येतील.

फायदे
फसवणुकीला आळा: जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास मालकाला तात्काळ सूचना मिळेल.

मार्गदर्शन: जमिनीशी संबंधित कायदे आणि प्रक्रियेबाबत प्रश्नोत्तर स्वरूपात मार्गदर्शन मिळेल.

सुरक्षितता: प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असल्याने मध्यस्थांचा हस्तक्षेप टळेल, आणि कागदपत्रे अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय असतील.

ही सेवा १५ जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होईल आणि १ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात लागू होईल, अशी माहिती प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा वेळेंची आणि खर्चाची बचत होतेय तसेच किफायतशीर आणि सुलभ मार्गाने कागदपत्रे मिळतील

Source :- krishi24.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *