Give a missed call to order – 9096633907

रेशीम उद्योग आणि भाजीपाला शेतीसाठी महत्त्वाचा कृषीसल्ला…
Agricultural advice

Agricultural advice : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी असल्यामूळे, शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत वाफसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला असून भाजीपाला आणि रेशीम शेतीसाठी पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.

➡️ भाजीपाला
खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. मिरची पिकाच्या लागवडीसाठी परभणी तेजस, पूसा ज्वाला, अग्नीरेखा, फुले ज्योती, जी-4, जी-3 इत्यादी जातींची निवड करावी. टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी देवगिरी, परभणी यशश्री, ए.टी.एच-1, पुसारूबी, धनश्री, भाग्यश्री, आर्कारक्षक इत्यादी जातींची निवड करावी. काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी.

➡️ फुलशेती
खरीप हंगामात फुलपिकांच्या लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. गुलाब पिकाच्या लागवडीसाठी ग्लॅडीयटर, सुपर स्टार, डबल डिलाईट, रेड मास्टर पीस इत्यादी जातींची निवड करावी. काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

➡️ तुती रेशीम उद्योग
तुती रोपवाटीका जुन महिन्यात एक एकर क्षेत्रासाठी 2 गुंठे क्षेत्रावर गादी वाफे करावेत. 50X3X1.5 फुट (लांबी-रुंदी-उंची) आकाराचे 3 गादी वाफे करावेत. 06 ते 08 महिने वयाचे तुती बेणे करण्यासाठी निवडावी. 3 ते 4 डोळे असलेले बेणे पेन्सील आकाराचे निवडून धारदार सिकेटरच्या साहाय्याने डोळ्याच्या लगत खालील बाजूस स्लॅटींग कट व 3 डोळ्याच्या वरच्या डोळया लगत फ्लॅट कट घेऊन बेणे तयार करावे. बेणे तयार करताना बेण्याची साल फाटणार नाही याची काळजी घ्यावी. रोगीट बेण्याची छाटणी साठी निवड करू नये. 5X3X2 किंवा 6X3X2 फुट पट्टा पध्दत लागवडीसाठी एकरी 6 हजार बेणे लागवड करावी. दोन भाग शेणखत व एक भाग माती या प्रमाणे जमीनीपासून 1.5 फुट उंचीच्या गादी वाफ्यावर 22 सेंमी लांबीचे तुती बेणे दोन ओळीत 15 सेंमी व दोन बेण्यात 10 सेंमी अंतर ठेवून

Source :- Krishi24.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *