
Worm control : अनेक शेतकऱ्यांनी कोबी आणि फुलकोबीची लागवड केली असून त्यांना गड्डा पोखरणारी अळीसह अन्य रोगांचा सामना करावा लागत आहेत. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी उपाय सुचवला आहे.
कोबी व फुलकोबी पिकावरील गड्डा पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी ४% निबोंळी अर्काची फवारणी करावी. अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास स्पिनोसॅड २.५ एस सी (SC) १२ मिली प्रति १० लिटर पाण्यातुन फवारावे.
ब्लाइंडनेस (वांझ रोप), ही विकृती कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोलीवर आढळून येते रोपाचा शेंडा विकसित होत नाही. कमी तापमान, शेंडा खुडला गेल्यास किंवा कीड-रोगांमुळे त्याला इजा झाल्यास अशा रोपाला गड्डा धरत नाही. रोपांची पाने रुंद, मोठी, गडद हिरवी आणि जाडसर राठ असतात.
यावर उपाययोजना म्हणजे लागवडीसाठी निरोगी जोमदार आणि शेंडा असलेली रोपे निवडावीत. रोपांची पुनर्लागवडीच्या वेळी काळजीपूर्वक हाताळणी करावी. कमी तापमान असल्यास पुनर्लागवड टाळावी. योग्य तापमानात करावे. वांझ रोपे शेतातून काढून टाकून त्यांचा त्वरित नायनाट करावा.
Source :- krishi24.com