
Farming grapes : हलक्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा बागेमध्ये जास्त पाणी द्यावे लागते. वाढत्या तापमानाच्या स्थितीमध्ये बागेला पाणी किती लागेल, याचा अंदाज शेतकऱ्यांना न आल्यास मण्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज पूर्ण होत नाही. परिणामी मणी तूज पडताना दिसून येतात.
तर भारी जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. इथे पाणी थोडेफार जरी जास्त झाले, तरी आर्द्रता वाढेल, त्यानंतर डाऊनी मिल्ड्यूच्या सुप्तावस्थेत असलेल्या बीजाणूंना अनुकूल वातावरण तयार होते.
परिणामी, आधी आवाक्यात वाटत असलेल्या डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळेही मणी लूज पडताना दिसून येतात.
काही परिस्थितीत बागेतील अन्नद्रव्यांच्या बिघडलेल्या संतुलनामुळे मणी लूज पडताना दिसून येतात. यात विशेषतः कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांची कमतरता, याआधी दिलेले पाणी आणि वाढीची अवस्था यांचा समतोल ढासळल्यासही मणी लूज पडण्याची समस्या दिसून येते. यापैकी आपल्या बागेत कोणती परिस्थिती आहे, हे पाहावे
त्यानुसार काही उपाययोजना कराव्या लागतील, मात्र मणी लूज पडण्याची समस्या टाळण्यासाठी पाण्याचा संतुलित वापर अत्यंत महत्त्वाचा आहे.
उपाययोजना करा
ज्या बागेत पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी बोदावर मल्चिंग करून घ्यावे. वेलीवर ताण कमी करण्यासाठी अॅण्टीस्ट्रेस रसायनाची ३.४ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यामुळे बाष्पीभवनाद्वारे उडून जाणारे पानातील पाण्याचे प्रमाण कमी होईल.
फळकाढणीच्या अवस्थेतील बागेत यावेळी अन्नद्रव्यांच्या वापराचा फारसा उपयोग होत नसला, तरी कॅल्शिअमची फवारणी थोड्याफार प्रमाणात मदत करेल. महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी हा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.
Source :- krishi24.com