Give a missed call to order – 9096633907

कोकणात फुलकिडीमुळे आंब्याचे मोठे नुकसान, असे होणार उपाय..

Mango arrangement : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्रिपातळीवरून दिल्या जात आहे.

फुलकिडीमुळे कोकणातील आंबा बागायतदारांचे अतोनात नुकसान होत आहे. बागायतदारांनी बाजारातील उपलब्ध किटकनाशकांचा वापर केला आहे. तरीही ही कीड नियंत्रणात आलेली नाही.

कीड नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्याच्या सूचना विद्यापीठाला देण्यात आल्या आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तातडीने यासंदर्भात कार्यवाही करणार आहे

Source :- krishi24.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *