
tomato lagvad : गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे बाजारातील दर घसरताना दिसून येत आहेत. पुणे बाजारात रविवारी टोमॅटोला सरासरी एक हजार तर कमीत कमी ६००रुपयांचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. खरीपातील लागवड वाढल्याने तसेच हिवाळ्यातील घटलेल्या मागणीमुळे टोमॅटोचे दर घसरले असल्याचे व्यापारी सांगतात. मात्र अनेकांना उत्सुकता आहे की रब्बीची लागवड केलेल्या टोमॅटोला किती दर मिळतील?
टोमॅटोंचे देशाचे रब्बी हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र आहे ३ लाख २४ हजार हेक्टर. मागील पाच वर्षांची टोमॅटोची सरासरी लागवड गृहित धरून हे सरासरी क्षेत्र काढण्यात आलेले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून १६ जानेवारीपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या रब्बी हंगामात आतापर्यंत टोमॅटोची लागवड झाली आहे १ लाख ९६ हजार हेक्टर, तर ३. मागच्या वर्षी याच काळात झालेली टोमॅटो लागवड, १ लाख ५१ हजार हेक्टर होती.
याचाच अर्थ यंदा मागील वर्षीपेक्षा लागवडीत ४५ हजार हेक्टर वाढ दिसत आहे. याशिवाय अजूनही टोमॅटोवर कोणताही रोग आलेला नाही. किंवा तशी सध्या स्थिती नाही. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार नाही, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. महत्त्वाचे म्हणजे सरासरी रब्बीच्या क्षेत्रापेक्षा ( ३ लाख २४ हजार हेक्टर) रब्बीची लागवड यंदा कमी असली, तरी मागच्या तुलनेत वाढली आहे.
मागच्या वेळी उन्हाळ्याच्या सीजनला टोमॅटोला चांगला दर होता आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा झाला. यंदा क्षेत्र वाढल्याने उत्पादन वाढेल, पण तरीही सरासरी पेक्षा कमीच क्षेत्र राहिल्याने बाजारभाव मागच्या वर्षापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, मात्र फार घसरणार नाहीत, असे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे.
भारतात टोमॅटोचे सरासरी हेक्टरी उत्पादन २० ते २५ टन प्रति हेक्टर आहे. तर हायब्रिड टोमॅटोमध्ये ते वाढून ५० ते ५५ टन प्रति हेक्टर पर्यंत जाऊ शकते. यावरून आपण यंदाच्या उत्पादनाचा अंदाज शेतकरी काढू शकतात. त्यातून त्यांना एप्रिल ते जून पर्यंत टोमॅटोचे बाजारभाव कसे असतील याची कल्पना येईल.
Source :- krishi24.com