Give a missed call to order – 9096633907

काळजी नको, मिरची, वांगे, भेंडीवरील रसशोषक किडीचा बंदोबस्त असा करा.

mirachi,vange,bhendi : या आठवड्यात हवामान कोरडे राहिल असे हवामान विभागाने सांगितले असले तरी अनेक ठिकाणी ढगाळ हवामान असते. तसेच पहाटेची थंडी टिकून आहे. त्यामुळे विषम हवामानात भाजीपाला पिकांवर रोग-किडींचा उपद्रव वाढताना दिसत आहे.

भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.

Source : krishi24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *