Give a missed call to order – 9096633907

हरभऱ्याचे भाव वाढले की घटले? काय सांगतो साप्ताहिक अहवाल

harbhara bajarbhav : लवकरच नवीन हरभरात बाजारात येणार आहे. पण त्याआधी सध्या हरभराच्या किंमतीत सातत्याने चढउतार होताना दिसून येत आहे. त्यातच नुकत्याच एका वृत्तानुसार ऑस्ट्रेलियात हरभऱ्याचे बंपर उत्पादन झाल्याने तो भारतात स्वस्तात मिळण्याची शक्यता असल्याने अनेक सरकार हरभरा आयात करण्याची स्थिती आहे, अशात हरभरा हमीभावापेक्षा कमी जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

दरम्यान रविवारी १२ जानेवारीला संपलेल्या आठवड्यात लातूर बाजारात हरभऱ्याच्या किंमती सरासरी ५ हजार ८६४, अमरावती बाजारात ५ हजार ७९१, हिंगणघाट बाजारात ६ हजार, खामगाव बाजारात ५ हजार ५३८, उदगीर बाजारात ५ हजार ८६४ प्रति क्विटल असे राहिले. दरम्यान सोमवारी लातूर बाजारात लाल हरभऱ्याला सरासरी ६ हजार ५०० रुपये, अमरावती बाजारात ५७५० रुपये, हिंगणघाटला ६ हजार रुपये असे दर राहिले. काल मकर संक्रांतीमुळे अनेक बाजार बंद होते. मात्र मुंबई बाजारात हरभऱ्याची सुमारे ९०० क्विंटल आवक होऊन भाव ७८०० रुपये प्रति क्विंटल इतके राहिले.

कृषी विभागाच्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हरभरा उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या किमती किमान आधारभूत किंमतीपेक्षा आहेत. रबी हंगाम २०२४-२५ साठी किंमान आधारभूत किंमत रु. ५६५० प्रति क्विं. आहे.

Source :- krishi24.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *