
krishi salla: सध्याच्या थंडीच्या वातावरणात केळी, आंबा, द्राक्षबागेचे संरक्षण कसे करावे याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञानी कृषी सल्ला दिला आहे.
केळी बागेचे संरक्षण कसे करावे?
केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस सकाळी पाणी द्यावे. केळी बागेस 00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 10% ईसी 10 मिली किंवा मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% डब्ल्यू जी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आंबा व्यवस्थापन:
आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बाग सध्या फुलधारण अवस्थेत आहे, बागेत परागीकरण व्यवस्थीत होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या किटकनाशकाची फवारण करू नये.
द्राक्ष संरक्षण :
किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.
किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून व उबदार पणा रहावा यासाठी द्राक्ष घड पेपरने किंवा पिशव्याने झाकून घ्यावेत.
Source :- krishi24.com