
Tomato Bajarbhav : या आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी पुणे, नारायणगाव बाजारातील टोमॅटोला वाढत्या बाजारभावाची लाली चढली होती. त्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव सरासरी २ हजाराच्या आसपास होते. मात्र मागील दोन दिवसांपासून टोमॅटोची लाली कमी होताना दिसत आहे.
आज दिनांक २६ डिसेंबर रोजी पुणे बाजारात लोकल वाणाच्या टोमॅटोची सुमारे २ हजार ८०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव १ हजार, जास्तीत जास्त २२०० रुपये आणि सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.
खेड-चाकण बाजारात टोमॅटोची सकाळच्या सत्रात ३३० क्विंटल आवक होऊन किमान १ हजार, जास्तीत जास्त २ हजार आणि सरासरी १५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. अकलूजला सरासरी १५०० रुपये तर वाईला सरासरी १८०० रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळाला.
दरम्यान काल दिनांक २५ डिसेंबर रोजी कोल्हापूरात टोमॅटोला सरासरी १५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. पुणे बाजारात सरासरी १७५० रुपये बाजारभाव मिळाला. खेड चाकणला १७५० रुपये सरासरी बाजारभाव मिळाला.
Source :- krishi24