
Soybean Bajarbhav: सध्या राज्यात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी किंमती मिळत असली, तरी मागील आठवड्याच्या तुलनेत २२ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात सोयाबीनच्या किंमती तुलनेने स्थिर राहिल्या. त्यात अगदीच नगण्य घट दिसून आली. दि. २२ डिसेंबर २०२४ अखेर: रु. ४१०० प्रती क्विंटल अशा होत्या.
सोमवारी म्हणजेच दिनांक २३ डिसेंबर रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची १६ हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ३७८१ तर सरासरी ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल इतके होते.
मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु. ४१०० प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ०.२% घट झाली आहे.
सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.
-मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर ७ टक्केनी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी वाशीम बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती सर्वाधिक होत्या (रु.४११८/क्विंटल.) तर अमरावती बाजारात सरासरी किंमती रु. ३९७४ प्रति क्विंटल होत्या.
जानेवारीत कसे असतील सोयाबीनचे बाजारभाव
अनेक शेतकऱ्यांना पुढील काळात बाजारभाव कसे असतील याची काळजी आहे. कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाच्या तज्ज्ञांनी जानेवारी ते मार्च २५ मध्ये चांगल्या दर्जाच्या सोयाबीनचे बाजारभाव कसे असतील याचा अंदाज वर्तवला आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सन २०२३-२४ मध्ये सोयामीलच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. चालू वर्षी एप्रिल ते सप्टेंबर २०२४ मध्ये ९.०८ लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे. जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील निर्यातीपेक्षा अधिक आहे (५.८६ लाख टन, एप्रिल ते सप्टेंबर २०२३).
सन २०२४-२५ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत रु. ४८९२ प्रती क्विटल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत (स्रोत: Agmarknet). मागील तीन वर्षातील जानेवारी ते मार्च या कालावधीतील महिन्यातील सरासरी किमती खालील प्रमाणे होत्याः
जानेवारी ते मार्च २०२२: रु.६६८४ प्रती क्विं
जानेवारी ते मार्च २०२३: रु. ५२८४ प्रती क्विं.
जानेवारी ते मार्च २०२४: रु. ४५९२ प्रती क्विंटल
यावरून यंदा जानेवारी ते मार्च २५ दरम्यान सोयाबीनच्या संभाव्य ४ हजार ४०० रुपये ते ५ हजार रुपये प्रति क्विंटल राहतील असा अंदाज वर्तवला आहे.02:22 PM
Source :- krishi24