Give a missed call to order – 9096633907

कांद्यात घसरण सुरूच; गोल्टी कांद्याला काय भाव मिळतोय?
Onion post

kanda bajarbhav today : मागील आठवड्यापासून कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी लासलगाव बाजारात कांद्याचे भाव स्थिरावले होते. त्यामुळे सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांना सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. सायंकाळी सर्व व्यवहार होईपर्यंत कांदा १९०० रुपयांपर्यंत खाली आला होता.

दरम्यान आज सकाळी लासलगाव-विंचूर बाजारात लिलाव सुरू झाले तेव्हा कांद्याचा भाव आणखी घसरला असून कालच्या तुलनेत २ रुपयांची घसरण झाली. आज सकाळच्या सुमारास लासलगावचा उपबाजार असलेल्या विंचूर बाजारात कांद्याच्या साडेचारशे गाड्याची आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी ८००, तर सरासरी १७५० असा बाजारभाव मिळाला.

दरम्यान कोल्हापूरमध्ये लाल कांद्याला सरासरी १८०० रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात सरासरी १३०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कराड बाजारात हळव्या कांद्याला चांगला दर मिळाला, सरासरी ३५०० रुपये असा दर होता.

दरम्यान नाशिक जिल्ह्यात अनेक खासगी बाजारातही शेतकरी कांदा विक्री करत असून हिवरगाव येथील खासगी बाजारात कांद्याला कमीत कमी १३०० रुपये, तर जास्तीत जास्त २३०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. याठिकाणी गोल्टी कांद्याला ४५० ते ८५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर त्यापेक्षा कमी दर्जाचा असलेल्या खाद आणि चोपडा कांद्याला १०० रुपये ते ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. चोपडा कांद्याची वरची टरफले निघून गेलेली असल्याने तो लवकर खराब होतो, तर खाद कांदा म्हणजे बऱ्यापैकी खराब झालेला कांदा.

Source :- krishi24.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *