
Aadhaar update : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, म्हणजेच त्यात नवीन माहिती टाकण्यासाठीची मुदत १४ डिसेंबरला संपली होती. मात्र तरीही अनेकांनी अजूनही आधारकार्ड अपडेट केलेले नाही. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी ही मुदत आता सहा महिन्यांनी वाढविली आहे. म्हणजेच आता आधार कार्ड १४ जूनपर्यंत अपडेट करता येईल.
आधार कार्ड अपडेट गरजेचे
१. आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे.
२. विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे.
३. या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांना आधार डाटा वैयक्तिक तपशीलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
कोणासाठी अपडेट आवश्यक
ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पत्ता किंवा अन्य अनुषंगिक तपशील अद्ययावत, अपटेड केलेला नाही, अशा सर्व नागरिकांनी आधार कार्डला ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत करणे आवश्यक आहे.
कसे करायचे आधार अपडेट
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार आधार कार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करावयाची आहे. (My Aadhaar) (एसएसयूपी) पोर्टलद्वारे ऑनलाइन आधार कागदपत्र अद्ययावत करण्यासाठी १४ जून २०२४ पर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आधार कार्डची कागदपत्रे अद्ययावत करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाता येईल.
किंवा www.uidai.gov.in या संकेतस्थळावर आधार अपडेट करता येईल.
Source :- Krishi24