
Dairy farming: महाराष्ट्रात बहुतेक सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका कायम असून या काळात शेळ्या, मेंढ्या यांच्यासह गाई, म्हशी व पशुधनाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
हिवाळ्यात गोठा व्यवस्थापन असे करा*
१. वारा, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी योग्य निवारा, गाभण गाई-म्हशींची योग्य व्यवस्था, आरामदायी व उबदार बसण्याची सुविधा तसेच शक्य तेवढे कोरडे वातावरण ठेवावे.
२. गोठा हवेशीर असावा. पुरेसा नैसर्गिक प्रकाश आणि ऊन हे आजारांचा प्रसार रोखण्यासाठी मदत करते.
गोठ्याचा भूभाग निसरडा नसावा आणि स्वच्छ करण्यास सोपा असावा.
३. रात्रीच्या वेळी शेडनेट किंवा बारदानाने गोठा बंद करावा. जेणेकरून गार वारे रोखण्यास मदत होईल.
रात्री गोठ्यातील बल्ब चालू ठेवावा, जेणेकरून तापमान नियंत्रित ठेवता येते.
४.आजारी जनावरांस पुरेसा चारा खाण्यास मदत मिळेल अशी व्यवस्था करावी.
५. बैठकीची जागा कोरडी असावी, ज्यामुळे ओलावा आणि थंडीचा गाईंवर परिणाम होण्यापासून संरक्षण होते. ६. बैठकीची जागा जितकी कोरडी तितकी जमीन उबदार राहते. थंडीपासून जनावरांचे संरक्षण होते. दिवसा गोठ्यामध्ये हवा खेळती ठेवणे महत्त्वाचे आहे. गोठ्यातील आर्द्रता, अमोनिया बाहेर जाईल याची काळजी घ्यावी.
*शेळ्याची काळजी अशी घ्या*
पैदाशीचे बोकड शेळ्यांपासून वेगळे ठेवावेत. विणाऱ्या शेळ्यांसाठी गोठ्यात स्वतंत्र व्यवस्था करावी. गाभण जनावरांचा आहार व आरोग्यावर लक्ष ठेवावे. थंड हवेपासून संरक्षण करण्यासाठी निवाऱ्याच्या जागेत वरीलप्रमाणेच बारदानाच्या पडद्यांचा वापर करावा.
*मेंढ्यांचे व्यवस्थापन*
थंड हवेपासून कळपाचे संरक्षण करावे. नवजात कोकरांना व मेंढ्यांचे थंडीपासून संरक्षण करावे. कोकरांचे शारीरिक वजन घेऊन नोंदी ठेवाव्यात. गाभण मेंढ्या व मेंढेनरांना ४०० ग्रॅम पशुखाद्य खाऊ घालावे.
Source :- Krishi24