Give a missed call to order – 9096633907

शेतकऱ्यांना विनातारण मिळणाऱ्या २ लाख कर्जचा लाभ कसा घ्यायचा?

kcc agriculture loan: शेतकऱ्यांना किसान कार्डच्या (kcc) च्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा रिझर्व्ह बँकेने वाढविली आहे. कृषी क्षेत्राला आर्थिक आधार देण्यासाठी आणि लागवडीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त तारण मुक्त कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती.

तसेच शेतीशी संलग्न अन्य कामांसाठीही कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याचे आरबीआयने जाहीर केले. सध्याची प्रत्येक शेतकऱ्यासाठीची 1 लाख 60 हजार रुपयांची कर्ज मर्यादा वाढवून 2 लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच ४ % व्याजदराच्या योजनेशीही या योजनेला जोडण्यात येणार असून शेतकऱ्यांचा व्याजावरील खर्चही वाचणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड काढण्याची गरज आहे. त्याची पद्धत जाणून घेऊ.

कुणाला मिळते किसान क्रेडिट कार्ड

शेतकरी, शेती भाडेपट्याने घेणारे बटाईदार, शेतीचे संयुक्त मालक असलेले शेतकरी, शेतकऱ्यांचे बचत गट, गटशेती करणारे शेतकरी

किसान क्रेडिट कार्डसाठी कुठली कागदपत्रे लागतात

१. अर्ज.
२. दोन पासपोर्ट फोटो.
३. ओळख पुरावा जसे की ड्रायव्हिंग लायसन्स/आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट, इ. कोणतेही एक दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे.
४. पत्ता पुरावा जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इ.
५. महसूल अधिकाऱ्यांनी रीतसर प्रमाणित केलेल्या जमिनीचा पुरावा.
६. एकरी क्षेत्रासह पीक पद्धती (पीक घेतले) पीक नोंदणीचा उतारा.
७. २ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कुठलेही तारण नाही. त्यापुढील कर्जासाठी तारणासाठीचे आवश्यक कागदपत्र

किती व्याजदार लागते?

रुपये तीन लाख कर्जाच्या मर्यादेसाठी ७ % व्याजदर आहेत. त्यापुढील कर्जासाठी बँकेच्या नियमानुसार. मात्र आता व्याजदराच्या ४% व्याजदर योजनेमुळे हे दर कमी होतील. म्हणजेच व्याज ४% द्यावे लागेल. तसेच ३ लाख कर्जासाठी कुठलीही प्रोसेसिंग फी लागत नाही. त्यापुढील कर्जासाठी बँकेच्या नियमानुसार तसेच जीएसटीही भरावा लागतो.

कशासाठी कर्ज मिळते?

1. KCC अंतर्गत कोणते क्रेडिट घटक समाविष्ट आहेत?
१. पिकांच्या लागवडीसाठी
२. काढणीनंतरचा खर्च
३. शेतकरी कुटुंबाची वैयक्तिक गरज
४. एक वर्षाच्या आत परतफेड करण्यायोग्य असलेल्या कृषी आणि कृषी यंत्रसामग्री सारख्या संबंधित गोष्टींसाठी लागणारे भांडवल म्हणून..

Source :- krishi24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *