Give a missed call to order – 9096633907

गहू तीन आठवड्याचा झालाय, पीकात तणही आलेय, असा करा बंदोबस्त….

Gahu sheti : अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेले गहू पिक सध्या 21 दिवसाचे झाले आहे. मात्र त्यामध्ये रुंद व गवत वर्गीय तण आढळून येत आहेत. त्यावर शेतकरी उपाय शोधत आहेत. ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. अरुण कांबळे यांनी त्यावर पुढील उपाय सुचवला आहे.

गहू पिकामध्ये रूंद व गवतवर्गीय तणांचे नियंत्रणासाठी खालील कोणत्याही एका तणनाशकांचा वापर करावा

१. मेट्रीब्युझिन ४२% + क्लोडीन्याफॉप-प्रोपारजील १२% WG प्रमाण: ५०० ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारावे फवारणी वेळ: पेरणी नंतर १८ ते २५ तन ३ ते ४ पानावर असताना दिवसांनी. सदर तणनाशक, शगुन २१-११, क्लोमेट, आल आऊट या व्यापारी नावाने बाजारात उपलब्ध आहेत.

किंवा
२. क्लोडीन्याफॉप प्रोपारजील १५ % + मेटसल्फुरोन मेथील १% सदर तणनाशक Vesta (व्हेस्ट) या व्यापारी नावाने बाजारात उपलब्ध आहे.
प्रमाण: ४०० ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारावे.
फवारणी वेळ: पेरणी नंतर १८ ते २५ दिवसांनी तने ३ ते ४ पानावर असताना.

किंवा
३. मेसोसुल्फुरोन- मेथाइल ३% + आयडोसल्फुरोन सदर तणनाशक Atlantis (अटलानटीस) या व्यापारी नावाने बाजारात उपलब्ध आहे.
प्रमाण: ४०० ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारावे.
फवारणी वेळ: पेरणी नंतर १८ ते २५ दिवसांनी तणे ३ ते ४ पानावर असताना.
अलग्रिप (Metsulfuron methyl) या तणनाशकाचे एकरी ८ ग्रॅम इतके थोडे प्रमाण असल्यामुळे १० लिटर पाण्यात (पंपात) डायरेक्ट मिसळणे व्यावहारिक दृष्ट्या शक्य होत नाही.

त्यामुळे एका बादलीत ८ ते १० मग पाणी घेऊन त्यामध्ये ८ ग्रॅम अलग्रिप तणनाशक अधिक तणनाशक पॅक सोबत मिळालेले स्टिकर व स्प्रेडर एकत्र मिसळून प्रथम स्टॉक द्रावण तयार करावे व या स्टॉक द्रवणाचा एक मग पंपातील पाण्यात घेऊन एकरी ८ ते १० पंप फवारावेत.

अधिक माहिती आणि उपायांसाठी आपल्या जवळचे कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.

Source :- Krishi24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *