Give a missed call to order – 9096633907

राज्यात विकसित झाले टोमॅटो आणि मिरचीचे आले नवे वाण, मिळाली जाणून घ्या वैशिष्ट्ये…

Tomato and Chilly variety: उद्यानविद्या पिकांची गुणवत्ता, अधिसूचना आणि वाण प्रसाराणासाठीच्या दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या ३१व्या केंद्रीय उपसमितीच्या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या उद्यानविद्या संशोधन (भाजीपाला) केंद्राने विकसित केलेले टोमॅटो वाण पीबीएनटी-२०, मिरची वाण पीबीएनसी-१७ आणि विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेला चिंच वाण ‘शिवाई’ यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली.

या वाणांच्या अधिसूचनेनंतर संबंधित वाण बियाणे प्रमाणन प्रणालीसाठी समाविष्ट केले जातील, असे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या पत्राद्वारे कळविले आहे.

या नवीन वाणांच्या मान्यतेमुळे शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार आणि परिणामकारक वाण मिळून त्यांच्या उत्पादनामध्ये सकारात्मक बदल होतील. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांसाठी या वाणांच्या विकासामुळे कृषी संशोधनातील महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी करून वाण विकासातील सर्व सहभागी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

विकसित वाणांची प्रमुख वैशिष्ट्ये

१) मिरची वाण ‘पीबीएनसी १७’ – हा वाण हिरवी मिरचीचे अधिक उत्पादन देणारा ५३१ ते ५४६ क्विंटल प्रति हेक्टर, मराठवाडा विभागासाठी खरीप हंगामामध्ये लागवड करण्याची शिफारस. हा वाण लिफकर्ल व अॅथ्राकनोझ रोगास मध्यम सहनशिल आहे.

२) टोमॅटोचा सरळ वाण ‘पिबीएनटी २०’ – हा वाण रबी हंगामामध्ये लागवड करण्याची शिफारस आहे. या वाणाची उत्पादन क्षमता ६१४ ते ६२० क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. या वाणाच्या फळाचा आकार गोल व गडद्द लाल रंग असुन प्रति फळाचे वजण ६० ते ६५ ग्रॅम आहे. लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी फळाची पहिल्या काढणीस येते. हा वाण लिफकर्ल व फळामधील अळी, पांढरी माशी व फुल किडे या किडीस मध्यम सहनशिल आहे.

३) चिंचेचा वाण ‘शिवाई’ – या वाणाच्या फळाची लांबी २०.४३ सेंटीमीटर, रुंदी ३.१३ सेंटीमीटर, फळाची सरासरी वजन ३५.३३ ग्राम, प्रति किलो गराचे वजन ४९७.०७ ग्राम, एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण ४१.६ टक्के, फळाची आम्लता ३१.२ टक्के आढळून आले आहे. चिंचेतील चिंचोक्याचा आकार मोठा आणि संख्या कमी असल्यामुळे गर जास्त मिळतो. शिवाई वाणाच्या एका झाडापासून फळाचे उत्पादन आठ ते नऊ क्विंटल (प्रति झाड ८४३.३३ किलो) उत्पादन निघते, प्रक्रिया उद्योगात चिंचेला मागणी आहे. चॉकलेट, जेलीसह विविध खाद्यपदार्थात चिंच वापरतात. फटाके उद्योगात चिंचोक्याच्या पावडरला मागणी असते. हा वाण कीड रोधक असून कोरडवाहू भागात उपयुक्त ठरणार आहे.

Source :- krishi24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *