
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीपानंतर आता रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा मिळणार असून त्यासाठी नोंदणी करण्याची शेवटची मुदत १५ डिसेंबर रोजी आहे.
अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा काढलेला नाही. जवळच्या संगणक सेवा केंद्राच्या मदतीने पीक विमा भरता येईल किंवा आपल्या मोबाईलवरही अवघ्या काही मिनिटांत पीक विमा भरता येईल.
मोबाईलवर पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील कागदपत्रांची गरज लागेल,
१. शेताचा ७ बारा उतारा
२. ८ अ- नमुना
३. बँक पासबुक
४. पीक पेऱ्याचे स्वयंघोषणापत्र
५ आधार कार्ड
असा भरा पीक विमा अर्ज
१. सर्वप्रथम पीक विम्याशी संबंधित https://pmfby.gov.in/ या वेबसाईटवर जा
२. तिथे उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भाषा बदलण्याचे पर्याय आहेत. त्यात मराठी भाषा निवडा.
३. त्यानंतर स्कीनवर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे ठळक नाव व त्याखाली विविध पर्यार्यांचे चौकोन दिसतील.
४. त्या चौकोनातील सर्वात डावीकडचा पहिला चौकोन की ज्यावर शेतकरी कॉर्नर असे नाव आहे, तो निवडा
५. तिथे क्लिक केल्यावर शेतकऱ्यांसाठी लॉगीन असा पर्याय येईल. त्यात आपला मोबाईल क्रमांक, त्या खालचा कॅप्चा कोड टाकून ओटीपी पर्यायावर क्लिक करा म्हणजे तुम्ही लॉगीन व्हाल
६. त्यानंतर आपला ॲप्लाय फॉर इंशुरन्स या पर्यायावर क्लिक करा म्हणजे रब्बी पिक विमा योजनेचा फॉर्म उघडेल.
७. फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
८. त्यानंतर फॉर्म चा प्रीव्हयू पहा काही चूक झाली असेल तर दुरुस्त करा.
९. सर्वात शेवटी अवघा १ रुपया पेमेंट करून, रब्बी पीक विमा अर्ज सबमिट करा.
source :- krishi24