Give a missed call to order – 9096633907

लासलगावला लाल कांद्याला आज काय बाजारभाव मिळाला उन्हाळी कांद्याचे काय आहेत दर

मागील दोन दिवसांपासून राज्यातील बाजारसमित्यांमध्ये लाल आणि उन्हाळ कांदा मिळून सरासरी पावणेदोन लाख क्विंटल आवक होत आहे. आज सकाळच्या (Today’s onion market rate) सत्रात मात्र कांदा आवक (Kanda Bajarbhav) सुमारे 25 हजार क्विंटल इतकी झाली.

मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा बाजारभावात काहीशी घसरण दिसली, तरी बाजारभाव बºयापैकी टिकून असल्याचे दिसून येत आहे. आज दिनांक 15 नोव्हेंबर 24 रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारसमितीत (Lasalgaon onion Market) लाल कांद्याची 1812 क्विंटल आवक झाली. लासलगावचा उपबाजार असलेल्या विंचूर बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात केवळ 850 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. लासलगाव बाजारात लाल कांदद्याला कमीत कमी 2 हजार रुपये, सरासरी 4300 रु. प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला.

लासलगाव-विंचूर बाजार समितीत लाल कांदद्याला सरासरी 4200 रुपये बाजारभाव मिळाला.

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत (Pimpalgaon Baswant Onion Market) पोळ -लाल कांदद्याची सुमारे 1200 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी आज कमीत कमी 1500, तर सरासरी 4051 रु बाजारभाव मिळाला. कालच्या तुलनेत लासलगाव व पिंपळगाव बाजारसमितीत कांद्याच्या बाजारात काहीशी घसरण पाहायला मिळाली. काल दिनांक 14 नोव्हेंबर रोजी लाल कांद्याला या बाजारसमित्यांत सरासरी 4500 रुपयांचा बाजारभाव मिळाला.

दरम्यान आज सकाळी पुणे बाजारसमितीत (Pune market) लोकल कांद्याची सुमारे 12 हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी दर 2 हजार रुपये तर सरासरी दर 4 हजार रुपये असा होता.

उन्हाळी कांद्याचे दर कसे आहेत?

आज लासलगाव बाजारसमितीत उन्हाळी कांद्याची 924 क्विंटल (Rabi Onion) आवक सकाळच्या सत्रात झाली. कमीत कमी बाजारभाव 3 हजार, तर सरासरी बाजारभाव 5200 असा सुरू आहे. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत उन्हाळी कांद्याची सुमारे 3हजार क्विंटल आवक होऊन सरासरी बाजारभाव 5400 असा मिळाला.

Source :- krishi24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *